नमस्कार मित्रांनो, माझ्या आधीच्या सूड ह्या कथेत एक पुरुष हा नायक होता. तर या सूड कथेत स्त्री ही नायिका आहे. लवकरच ही कथा मी पूर्ण करेन. तोपर्यंत वाचकांसाठी ही कथेची सुरुवात
---------------------------
सूड - २
सागराच्या थंडगार लाटांच्या स्पर्शाने कधीतरी तिला जाग आली. तिचे अंग पूर्ण बधीर झालेले होते. एक सेकंद तिला काही कळालेच नाही. दुसर्याच क्षणी तिच्या अंगात वेदनांचा डोंब उसळला आणि तिचे सर्वांग संतापाने कापू लागले. कमरेच्या खालचा भाग थरथरत होता. आहे त्या पालथे पडलेल्या स्थितीतच ती मुसमुसून रडू लागली. कारण तिच्यावर बलात्कार झाला होता. वासनेने वखवखलेल्या चार नराधमांनी तिच्यावर अत्यंत पाशवी असा बलात्कार केला होता. बराच वेळ रडत होती ती. शेवटी कसला तरी निश्चय केल्यासारखी ती कशीबशी रांगत कोरड्या वाळूत आली. तिला तीव्र वेदना होत होत्या. संपूर्ण कंबर पुढून आणि मागून ठणकत होती. सगळ्या शरीराची आग आग होत होती. बर्याच वेळाने ती तेथून उठली व इकडे तिकडे पडलेले तिचे तोकडे कपडे उचलून परिधान करु लागली. अजूनही पूर्ण अंधारच होता. पण पूर्व दिशेला क्षितिजाच्या रेषेवर सूर्योदयाची चाहूल लागत होती. कपडे घातल्यावर तिला जरा बरे वाटले. पण तिच्या मनात खोलवर एक कधीही न भरली जाणारी जखम झाली होती आणि त्या जखमेची वेदना तिला स्वस्थ बसून देत नव्हती.
समुद्राच्या त्या वाळूत मोठ्या शिलांनी एक बाजू व्यापलेली होती त्या आडोशातच तिच्यावर अमानुषपणे तो बलात्कार झाला होता. पूर्वेला लाली फाकू लागली तशी ती भानावर आली नि मनोमन तिने निश्चय केला की त्या चारही नराधमांवर सूड उगवायचा.
2 comments:
लय भारी वाट बघतोय
प्लीज् पुढचा भाग लवकर टाका
Post a Comment